✳ महत्वाच्या Windows keys✳

  ✳ महत्वाच्या Windows keys

संगणकावर काम करताना आपली कामे जलद गतीने होण्यासाठी आपणास काही ट्रिक्स उपयोगी पडतात अशाच काही ट्रिक्स बाबत आज माहिती पाहू....

➡ Windows + M: चालू असलेल्या सर्व विंडो ताबडतोब टाक्सबार वर मिनिमाईज केल्या जातात. अचानक आलेल्या ति-हाइत व्यक्तीपासुन तुम्ही करीत असलेले काम लपविण्यासाठी या कि चा वापर होऊ शकतो.
➡ Wndows+Shift+M: जेव्हा तुम्हाला या सर्व विंडो परत हव्या असतील तेव्हा Windows + Shift + M कि प्रेस करावी आणि तुमच्या समोर पुर्वी प्रमाणे सर्व विंडो आलेल्या दिसतील.

➡ Windows + Home: सध्या चालू असलेला प्रोग्रॅम सोडून इतर सर्व विंडोज मिनिमाइज केल्या जातात.

➡ Windows + L: कॉम्प्युटरला ताबडतोब लॉक केले जाते.

➡ Windows + Tab: याला Aero Flip 3D असे म्हणतात. या कि चा वापर करुन तुम्ही जलद गतीने ओपन असलेल्या सर्व विंडोंचा प्रिव्हू पाहू शकता. येथे ओपन असलेल्या सर्व विंडोंचा ढिग दिसतो.

➡ Windows + Pause: Systems Properties हा डायलॉग बॉक्स जलद गतीने ओपन करण्यासाठी हि कि प्रेस करावी.

➡ Windows + T: टास्क बार वरील एका प्रोग्रॅम मधून दुस-या प्रोग्रॅम मध्ये जाता येते.

➡ Windows + Up/Down: चालू असलेली विंडो maximizes आणि restores करता येते.

No comments:

Post a Comment