ई-मेल हाताळतांना घ्यावयाच्या दक्षता

👉अनोळखी कुणाकडूनही आलेली मेल.
👉विचित्र विषय, ज्याचा आपला काही संबंध नाही.
👉कोणत्याही स्पर्धेत / लकी ड्रॉ इ. मधे भाग न घेता बक्षिस लागणे. (हे येऊन गेलंय)
👉देवाचे / अल्लाचे / गॉडचे /साईबाबा वा तत्सम श्रद्धास्थानांचे नांव घेऊन आलेली मेल

- या सर्व स्पॅम 🚫आहेत असे गृहित धरून चालावे. न उघडता डिलीट करणे. काही लोकांना अ‍ॅटेचमेंटसकट सगळ्या मेल्स लॅपीवर्/काँप्युटरवर डालो करायची सवय असते. व्हेरी बॅड. या मेल ला रिप्लाय्/वाचणे/फॉरवर्ड करणे इ. केल्यास "स्पॅमबॉट" तुमची मेल व्हॅलिड आहे असे गृहित धरतो, मग तुमची आयडी पुढील डेटाबेसला विकली जाऊ शकते. वा अ‍ॅटॅचमेंट मधून कीलॉगरसारखी अ‍ॅप्लिकेशन्स तुमच्या काँप्युटरमधे घालू शकते.

😎याउपर मेल उघडलीतच, तर स्पॅम ओळखण्याचे व स्वतःची वाचविण्याचे सोपे फंडे :

👉भाषा अशुद्ध असते. - सरळ डिलीट करणे.

👉तुम्ही कोण हे ठाउक नसताना फक्त तुमच्या मेल अकाऊंटमधे लिहिलेले नाव त्यात गुंफलेले असू शकते.
👉विचित्र गोष्टींची मागणी असते. उदा. आमची नामांकित कंपनी असून त्यामध्ये शेअर्स गुंतविल्यास एका वर्षात डबल रक्कम परत मिळेल.अथवा कुटुंबातील सदस्यांच्या विम्याची रिक्स घेण्यासारखी माहिती. ईत्यादी

👉काहीवेळा तुमच्या ओळखीच्या माणसाची मेल असते, त्यात म्हटलेले असते, की मी अमुक गावी आलो आहे, माझे पाकीट पासपोर्ट इ. हरवले आहे, अन अमुक प्रकारच्या पैसे ट्रान्स्फरने मला तात्काळ मदत करा. (वेस्टर्न युनियन) - या परिस्थितीत त्या व्यक्तीस / त्याच्या घरी फोन करून माहिती घ्या, की काय झालं आहे नक्की.

👉आपल्या बँकेकडून आल्यासारखे वाटणारे पत्र. पासवर्ड रीसेट करणे गरजेचे आहे इ.
किंवा तत्सम. - कधीही मेलमधील लिंकवर क्लिक करून बँकेच्या साईटवर जाऊ नये. वेगळी खिडकी उघडून आपल्या हाताने आपल्या बँकेचा पत्ता टाईप करून तिथे जावे. व काय ती खातरजमा करावी. फार वाटले तर फोन करून चौकशी करावी.

अधिक खबरदारीचे उपाय :
१. वेगवेगळ्या कामांचे वेगळे ई मेल आयडी बनवावेत.
(एम आर लोकांना देण्यासाठी वेगळा. आय.एम.ए. इ. असोसिएशन्स ना देण्यासाठी वेगळा. माबो, व इतर संस्थळांसाठी वेगळा, व माझा पर्सनल, जो फक्त जवळच्या लोकांना व बँकेला दिलेला आहे. यातील क्र. १ ची सगळी मेलबॉक्स अधून मधून न वाचता उडवायची असते. असोशिएशन वर भरपूर स्पॅम असते, पण ऑफिशियल मेल्स हेडींगवरून लगेच कळतात. तिसर्‍यावर फारसा संवाद नसतो;) व घरचा सेफ आयडी असतो.)
२. नेटवरून बँकेचे / पैशाचे व्यवहार करताना नेहेमीच व्हर्च्युअल कीबोर्ड वापरावा.
३. माहितगार व्यक्तीचे मार्गदर्शन नसेल तर पोर्न सर्फिंग करू नये.  भारतात तर करूच नये. कायद्याने गुन्हा आहे  (पण केलेच तर नको त्या बायकांची चित्रे डेस्कटॉपवर येऊन बसतात. अन त्या 'व्हर्चुअल गर्ल्स' हाकलून देणे भयंकर कटकटीचे होते.)
४. ब्राऊजरचा स्टेटसबार वाचायला शिकावे. तुमी कोणत्या साईटवर जात आहात, वा नेले जाणार आहात हे माऊस हॉवर केल्यावर तिथे दिसत असते. रिडायरेक्शनही दिसते.
५. कुठेही क्रेडीटकार्ड/ बँकिंगचे डीटेल्स टाईप करताना अ‍ॅड्रेस बार मधे http ऐवजी https दिसते आहे की नाही हे बघा.
७. अनोळखी आडनावाच्या अ‍ॅटॅचमेंट फाईलवर डबलक्लिक करू नका. बहुतेकदा विंडोज मधे आडनाव लपवलेले का असते कुणास ठाऊक. (आडनाव = extension. उदा. interesting.pdf मधील pdf हे आडनांव आहे. पण त्याचा आयकॉन घेऊन व्हायरस .exe / .com / .bat इ. आडनावांने असू शकतो. कोणतीही एक्झिक्यूटेबल फाईल माहित नसताना चालवून पाहू नये)

No comments:

Post a Comment