आकारीक मूल्यमापन

१) आकारीक मूल्यमापन म्हणजे काय?
👉 आकारिक मूल्यमापन म्हणजे
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन.
👉 विद्याथ्याचं व्यक्तीमत्व आकार घेत असतांना केललं मुल्यमापन म्हणजेच आकारिक मुल्यमापन
👉 अध्ययनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन होय.
👉 विद्यार्थ्यांच्या शारीरिक  मानसिक   बौध्दिक  सामाजिक  विकासाची  चाचणी.. म्हणजे मूल्यमापन 


२) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन साधनतंञाची उपयुक्तता किती व कशी? 
👉 आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation) – 

              विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असतांना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. या मूल्यमापनात पुढील साधनतंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे.
दैनंदिन निरीक्षण
तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)
प्रात्यक्षिक / प्रयोग
उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटांत, स्वयंअध्ययनाद्वारे)
प्रकल्प
चाचणी – (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (Open book test))
स्वाध्याय / वर्गकार्य
इतर – (प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.)
वरील साधन तंत्रापैकी इयत्ता, विषय व उद्दिष्टे विचारात घेवून अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा.

            मूल्यमापन करतांना किमान पाच साधनतंत्राचा वापर करावा, तर कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन निरीक्षण, प्रात्यक्षिक व उपक्रम/कृती या तीन साधनतंत्राचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांना वर्षभरात किमान एक प्रकल्प व प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकांसह लेखी चाचणी (Open book test) घेणे अपेक्षित आहे.
👉 विद्यार्थ्यांंचे व्यक्तीमत्व आकार घेत आसतांना विहीत केलेल्या सर्व  क्षमतांचे निकष पुर्ण होत आहेत हे सतत पाहणे व त्यासाठी  तंञांचा वापर करणे
👉 सुप्तगुणांचा शोध घेता येतो.
अध्ययन-अध्यापनातील त्रुटी दूर करण्याची दिशा निश्चित करता येते.
आपले विचार व मत कसे व्यक्त करतो हे टिपता येते.
प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते.


३) तोंडीकाम साधनतंञाची उपयुक्तता किती वाटते? त्याचा योग्य वापर कसा करावा? 
👉 वेदापासूनची आपली अभ्यासशैली
मुखोद्गत तंत्रावर अधिक भर देणारी
👉 आपण  तोंडी काम मध्ये  पाठांतर  घेऊ  शकतो .. कविता  गायन , भाषण, वाचन   घेऊ  शकतो
👉 निडलेल्या सर्व तंत्राचे नियोजन तयार आसावे व विशेष करून  तोंडी तंञाचा प्रथम  करावा.. लेखनात  कमजोर  असणारे  विद्यार्थीस  तोंडी  काम  उपयुक्त  आहे.. सभाधीटपणा  तोंडीकामातून  च  दिसतो
👉 अनेक घटक असतात..नेहमीच
आपण तोंडीकाम घेतो..पण आकारिक मूल्यमापन करताना
एकच घटक घेऊन त्यावरच तोंडी
काम घ्यावे व गुणदान करावे
👉 योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी असेल तरच... तोंडीकाम यशस्वी 
👉 तोंडीकाम हे साधनतन्त्र निवडले असता याद्वारे विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तिला संधि मीळते,सभाधीटपणा वाढतो.आत्मविश्वास वाढतो,मनातील भिती न्यूनगंड दूर होतो,शिक्षकाशी अधिक जवळचे नाते निर्माण होउन शाळेविषयी शिक्षकप्रती आकर्षण निर्माण होते.....
👉 तोंडकाम सत्राच्या आठवड्यातच करावे तशी टाचणात नोंद करावी
👉निकष नजरे समोर ठेवा.
 व गुणदान करा
👉 यासाठी आपल्याला तोंडीकामात आपण कृतियुक्त कविता गायन घेउ शकतो,प्रश्नोत्तरे,अध्ययन अध्यापनावेळि प्रसंगानुरूप संवाद घेता येइल,गटचर्चा,विविध कृति या व इतर बाबी नियोज्नानुसार घेउ शकतो
👉 CCE= 
Continuous
 comprehensive
 Evaluation

हे नावाप्रमाणेच वेळोवेळी व्हावे

नाहीतर प्रामाणिक मूल्यमापनात 
अडचणी  येतील
👉मुलांचे उच्चारदोष दुर करायला हवेत 

४ ) दैनंदिन निरीक्षण साधनतंञाची उपयुक्तता किती? वापर कसा केला जावा?
👉 दैनं. निरी. म्हणजे
मुलांच्या वर्तनाची
total profile असते
👉 निरी. नोंद निगेटीव्ह नसावी.. विशेष गुणनोंद करावी
👉 दैनंदिन  निरीक्षण  मधुनच आपल्या ला विद्यार्थ्याच्या  वर्तनाची माहिती  होते
👉 विद्यार्थी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी दैनंदिन निरीक्षण महत्वाचे 
वर्तनबदल होतो का ते समजले जाते
कल व आवड समजते
👉 निरीक्षण मध्ये सर्जनात्मक बाबींची नोंद महत्वपूर्ण
👉 शिकण्याची गती व  पध्दितीचा मागोवा घेता येतो.
👉 कच्या नोंदी ठेवून त्यातील चांगल्या नोंदी निवडाव्यात
👉 Negative नोंद वेगळ्या कागदावर 
घ्यावी 

Feedback करीता मदत होईल
बालकाची कमजोरी
शिक्षकांच्या लक्षात राहिल
👉 नुसत्या नोंदी करायची नाही तर कमकुवत बाबीत मार्गदर्शन करायचे आहे
👉 नुसत्या नोंदी करायची नाही तर कमकुवत बाबीत मार्गदर्शन करायचे आहे
👉 हेतुपुरस्सर उदिष्ट निश्चित करुन निरिक्षण व वस्तुनिष्ठ नोंदी हव्यात समस्या व उपायांचे चिंतन व पालकांशी अपेक्षित बदलांसाठी निरिक्षणाने प्रारंभिक बदल व नंतर अध्ययन अनुभवाअंती झालेले बदल गुणात्मक तपासणेसाठी दैनंदिन निरीक्षण साधन उत्तम आहे.
👉 चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी,  वर्गात 50-60 विद्यार्थी असताना किती शिक्षक दैनंदिन निरीक्षण रियल करतात. 
कि रेकॉर्ड खरडण्यासाठी आलटून पालटून नोंदी केल्या जातात?
👉 नोंदी जास्त करण्यात वेळ जाऊ शकतो.
थोडक्यात विद्यार्थी कसा हे कळले पाहिजे
👉 नोंदी फक्त परिक्षा आल्यावर नाहीत.. तर वर्ष्भरात सातत्य ठेवून करायच्या 
आहेत..
👉 आम्ही  नोंद बँक  केली आहे.. धाञक सर 
👉 महत्वपूर्ण नोंदीच ठेवलेले बरे.. कागदी घोड़े नको..
👉 संख्यात्मक+गुणात्मक+अभिप्राय=मुल्यमापन ,मुल्यमापन ही प्रक्रिया आहे फक्त विद्यार्थी माहितीसंकलन नव्हे.

५) प्रात्यक्षिक /प्रयोग साधनतंञाची उपयुक्तता किती वाटते? 
👉 Every action is source of thought
👉 मुलांना प्रत्यक्ष कृतीचा अनुभव येतो
👉 नवनवीन संकल्पना समजुन घेण्यासाठी प्रात्यक्षिक खुप उपयोगी साधनतंञ
👉 शिक्षक हा येथे सारथी असतो
👉 काय केले तर काय घडते याचे उत्तर प्रयोगातुनच कळते
👉प्रात्यक्षिक निकष.. निकषामध्ये कृतीमागील कल्पकता,अचूकता,वेगळी रीत,सहजता या गोष्टींचा विचार
👉 कौशल्यतपासणीस लेखी तोंडीतंत्र काम करत नाही तेव्हा प्रात्यक्षिक तंत्र उपयोगी ठरते प्रत्यक्ष कृती चालु असताना कृती मुल्यमापन व कृती पुर्ण झालेवर वस्तुमुल्यमापन करता येते.
👉 शिक्षकाने सारथ्याचे कर्तव्य उचित पार पाडले तर अध्यन रुपी रथातील सर्व प्रवासी आपले ध्येय सहज गाठु शकतील.. घोकंपट्टी टाळता येते.
👉 प्रात्यक्षिक परीक्षेला वेळ लागतो व ज्ञान अभिरुचीचे दृष्टिकोणविकिसाचे मापन करता येत नाही... कृती क्रमवार करण्याची सवय लागते.
👉 वस्तुनिष्ठ  माहिती प्रयाेगातुन कळते.विद्यार्थी आवडीने स्वतःहुन  सहभागी होतात.करुन पाहतात.
👉 उपयोजन व कौशल्य उदिष्टांचे मापन ,भाषेत मागास मुलाचे यथार्थ चित्र मिळण्यास उपयोगी,गायन वादन प्रत्यक्ष कृती मुल्यमापनास ऊपयोगी तंत्र.


६) उपक्रम व कृती या साधनतंञाची उपयुक्तता व कार्यपद्घती कशी? 
👉 कृती, उपक्रमातुन स्वयंअध्ययनाची सवय लावता येईल
👉 माहीती मिळविण्यासाठी संदर्भ हाताळयाची मुलांना सवय लागते
👉 उपक्रमातून मुले चटकन शिकतात व गोडी निर्माण होते
👉 उपक्रम स्व: चा सहभाग व स्व : तचे विचार मांडतो
👉 लेखनक्षमता अक्षम बालकाच्या ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण संश्लेषण या क्षमतांस तपासता येते.
👉 सर्जनशील विद्द्यार्थी समजतात
👉 गोडी निर्माण होतेच शिवाय संकल्पना दृढ होतात
👉 गट पाडून उपक्रम दिले तर मुले आवडीने करतील
👉 विषयनिहाय..घटकनिहाय.. उपक्रमची
यादी आधीच तयार करावी
👉 उपक्रमामुळे उपयेाजन कौशल्यांचा विकास करता येतो
👉उपक्रमांची बांधणी अतिआवश्यक वाटते
त्या व्दारे मुलांना कृतिशील अध्ययन अनुभव देता येतात
शालेय वातावरणात कमालीचा बदल दिसतो
याचा अनुभव आपण सर्व जण घेत आहोतच पण त्यात सातत्य ठेवणे देखील तितकेच आवश्यक वाटते
👉 विविध कृतीतून विविध कौशल्य लवकरच प्राप्त होतात
👉 आनंददायी शिक्षण मिळते
👉 पाठाच्या शेवटी किंवा जिथे जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी आपल्या स्वतः च्या अध्ययन अनुभवांचा लिखित संग्रह करून ठेवला तर
किंवा त्या त्या पाठाच्या अध्ययन अनुभवांची मांडणी,उपक्रमांची मांडणी एका वहीच्या कागदावर लिहून तो कागद त्या पाठाच्या जवळ स्टँपल करून ठेवला तर आपले काम देखील सोपे होते आणि विद्यार्थ्ाना अध्ययनात विविधता आणता येते 🙏


७) प्रकल्प या साधनतंञाची उपयुक्तता व कार्यपद्घती कशी असावी? 
👉 ज्ञानाचा शाळा बाहेरील जगाशी संबंध प्रकल्प मुळे जोडला जातो
👉 निरीक्षण करण्याची सवय लागते.. दैनंदिन जीवनाशी, व्यवहाराशी सांगड घालता येते
👉 कृतीतील वेगळेपणा हेरता येतो.. 
👉 मुलांच्या अंगी कोणतेही कार्य करताना त्यामध्ये सुबकता, आकर्षकता ,अचुकपणा,यावी जिद्द, चिकाटी हे गुण विकसित करता येण्यासाठी प्रकल्प उपयुक्त ठरतात
👉प्रकल्प कार्यवाही..... माहीतीचे संकलन - माहीतीवर प्रक्रिया - निष्कर्ष - सादरीकरण - निवेदन - अहवाल...
👉 दोन्ही सत्रांपैकी कोणत्याही एका सत्रात एका मुलाचा एक प्रकल्प
👉 प्रकल्प निवडताना मुलांच्या आवडीनुसार निवडण्यात यावा,वेळेप्रसंगी आपल्या सुलभकाच्या भुमिकेने मार्गदर्शन करावे

८) चाचणी ची उपयुक्तता व कार्यपद्घती कशी असावी? 
👉 पुस्तकासह चाचणी योग्य..
परंतु प्रश्न विचारप्रवर्तक असावेत
👉 पुस्तकासह चाचणी असेल तर एकाच पाठ्यांश वर असावी
👉चाचणी मध्ये मुक्तोत्तरी प्रश्न असावेत 


९) स्वाध्याय या साधनतंञाची उपयुक्तता व कार्यपद्घती? 
👉 स्वाध्याय तपासले गेले नाही तर.. मुलांवर त्याचे विपरीत परिणाम दिसुन येतात
👉 स्वाध्यायमुळे मिळालेल्या ज्ञानाचे दृढीकरण होण्यास मदत होते.
👉 स्वाध्याय  मोजकेच असावेत.. तपासले जावेत
👉 स्वाध्याय दिल्या मूळे  विद्यार्थी व शिक्षक म्हणून आपले पण मुल्यमापन होते..
मुलाला किती समजले हे लक्षात येते..
तसेच त्यांना आपण कसे शिकवले हे पण...
👉 दिवसाला एकच  स्वाध्याय असावा...तोही कोणत्याही एका विषयाचा. मुलांना आनंददायी स्वाध्याय असावा....
👉 स्वाध्याय च्या ओझाखाली मुलाची कुचंबना होऊ नये
👉 स्वाध्याय किती असावेत हे जरी आपल्याला प्रशिक्षनात सांगितले असले तरी..
1 ते 2 असावे परंतु मला असे वाटते की  विद्यार्थ्याच्या बुध्दिमत्ते नुसार ज्या विध्यार्थ्याची प्रगति समाधान कारक नसेल त्यांना स्वाध्याय वाढवून द्यावे..

तसेच 

उत्कृष्ट स्वध्याचे प्रकट वाचन वर्गात घ्यावे...
नवनीत गाईड ची भाषा नाही त्या स्वाध्याय असेल तर त्याला प्राधान्य द्यावे
👉 स्वाध्याय तपासतांना स्टार द्यावेत.. हसरे फेस द्यावेत

१०) आकारीक मूल्यमापन ची इतर साधने कोणती? 
👉 इतर साधने
हेतू
👉स्वत:चे काम स्वत: तपासणे.

👉मित्रांचे काम तपासणे.

👉शिकताना स्वत:चे व सोबत्याचे काम तपासण्यासाठी पाठ्यपुस्तके व अन्य संदर्भ हाताळणे.

👉कार्यपद्धती:

॰स्वयंमूल्यमापन स्वयंमूल्यमापनातून पडताळता येणारे घटक विचारात घ्यावेत.प्रश्नपेढ्या-उत्तरसूचीच्या पेढ्या तयार ठेवाव्यात.
१.मुलांना शब्द वाक्ये यांचे श्रुतलेखन देणे.पाठ्यपुस्तकात पाहून त्यानाच तपासावयास सांगणे.
२.प्रश्नकार्डांच्या मदतीने उत्तरे लिहिणे.उत्तर कार्डांच्या मदतीने तपासणे.
व्यख्या,सूत्रे,नियम लिहिणे,पाठ्यपुस्तकात पाहून पडताळणे.

👉@सहाध्यायी मूल्यमापन
-विद्याथर्यांना परस्परांचे काम तडताळण्यास सांगा