वेळेचे नियोजन करा
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 09, 2010 AT 12:00 AM (IST)
![]() वेळ निघून गेल्यावर तो जागा होतो व प्रयत्न करू लागतो. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत, महिन्यांपासून महिने व दिवसांमागून दिवस कसे निघून जातात, याचा पत्तादेखील लागत नाही. नोकरीसाठीसुद्धा वयोमर्यादा निश्चित केलेली असते. वय संपल्यावर कोणीही विचारत नाही किंवा नंतर नोकरीही मिळत नाही. त्यामुळे आपल्याजवळ आता जो वेळ उपलब्ध असतो त्याचे नीटपणे, कार्यक्षमतेने व जाणीवपूर्वक नियोजन केले, तर बरीच चांगली कामे होतात. नुसते हातात घड्याळ बांधून काहीही उपयोग होत नाही. तर घड्याळाप्रमाणे, काट्याबरोबर चांगली विधायक व करिअरविषयक कामे केली तर मनुष्यजातीचे कल्याण होते व जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते. वेळ हा बहुमूल्य आहे. नाशवंत आहे. वेळेबरोबर जो चालतो व वागतो त्याचेच चांगभले होते. हे लक्षात घ्यावे. काही लोक दिलेला शब्द तर सोडाच; पण वेळ पाळत नाही. त्यामुळे संबंध खराब होतात. होणारे काम होत नाही, झालेली कामे बिघडतात, गैरसमज निर्माण होतात. परंतु जर कोणतेही काम वेळेवर किंवा निर्धारित वेळेच्या पूर्वी केले तर प्रतिष्ठा, नावलौकिक वाढतो. समजा जर रेल्वेचे, लोकलचे, बस व एसटीचे टाइमटेबल बिघडले किंवा त्यामध्ये दिरंगाई झाल्यास प्रवाशांना किती त्रास होतो, याची कल्पना आपल्याला आहे. त्याचप्रमाणे उद्योग व व्यवसायात जर आपण लेट सर्व्हिस किंवा सेवेला विलंब लावला तर तसाच त्रास इतरांना होतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. काही वेळा कामगार किंवा कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संप, मोर्चे, धरणे, उपोषण किंवा कमी काम करतात. यामुळे विनाकारण आपल्या बहुमूल्य उत्पादक वेळ वाया जातो. अपवादात्मक स्थितीमध्ये हे करणे योग्य आहे. परंतु नेहमीच संपाचे अस्त्र उचलणे योग्यही नाही. जपानमध्ये एकदा एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटर ग्राहकांशी बोलत नव्हते किंवा त्यांनी विचारलेल्या गोष्टींना उत्तरे देत नव्हते. ते फक्त ग्राहकांना शर्टला लावलेली काळी फीत दाखवीत होते व एका कागदावर लिहिलेला मजकूर दाखवीत होते. त्यावर लिहिले होते की मालकाबरोबर आमचा वाद चालू आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आपली सेवा करू; परंतु बोलणार नाही. आम्हाला क्षमा करा व या कागदावरच आपली ऑर्डर द्या. काही लोक काम करून एका वेगळ्या मार्गाने संप करतात, ही एक विशेष घेण्यासारखी गोष्ट पाहायला मिळते. |
Pages
- Home
- आमची शाळा
- ई-साहीत्य
- शासन निर्णय
- ऐतिहासिक पुस्तके संग्रह(PDF)
- नोकरी मार्गदर्शन केंद्र
- अरविंंद गुप्ता (science projects)
- Learn HTML
- msce pune
- MPSP
- SARAL
- SCHOOL REPORT CARD
- U-DISE
- इ.1ली ते 7 वीच्या कविता
- शैक्षणिक पुस्तके DOWNLOAD करा
- Google Translate
- चला गणित शिकूया
- कोणत्याही शाळेचा udise शोधा
- स्वातंत्र्यदिन भाषण
- शालार्थ प्रणाली
- Shalasiddhi manual & गुणदान तक्ता
- शाला सिद्धी वेबसाईट
- शिक्षकांचे ब्लॉग
- गणित
- Link aadhar to pancard
- मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम
वेळेचे नियोजन करणे
Subscribe to:
Posts (Atom)