PDF software

कॉम्प्युटर वापरणारे आता माहितीच्या आदान प्रदानासाठी, संवाद आणि पत्रव्यवहारासाठी भारतीय भाषांचा वापरही मोठय़ा प्रमाणावर करू लागलेत. बर्‍याच कंपन्या, वृत्तपत्रं  किंवा जाहिरात एजन्सीज तर स्वत:साठी विशेष फॉण्टसुद्धा विकसित करून घेतात. रोमन भाषेतून मराठी लिहिण्यापेक्षा थेट मराठीच लिहिण्यावर अनेकांचा भर असतो ही चांगली गोष्ट आहे.


मात्र अनेकदा तो सगळा मजकूर वर्ड किंवा एक्सेलमध्ये पाठवला की हमखास फॉण्ट मिसिंग नावाचा मोठा प्रश्न तयार होतो. काही केल्या मजकूर वाचता येत नाही. तसं होऊ नये म्हणून मग आपल्या मजकुरासोबत आपला फॉण्टही पाठवावा लागतो, पण अनेकदा असा फॉण्ट काही देता येत नाही.  मग प्रश्न सोडवायचा तर ते डॉक्युमेंट पीडीएफ करून पाठवावं लागतं. फाईल पीडीएफ करण्यासाठी आपण फार पूर्वीपासून अँडोबची सॉफ्टवेअर वापरत आहोत. आता मात्र अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी वापरायला अत्यंत सोपे असे प्रोग्राम तयार केले आहेत. ज्याचा वापर करून आपण कुठल्याही फॉरमॅटमधली फाईल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सहज कन्व्हर्ट करू शकतो. तेही अगदी मोफत. कारण यातील बरेच प्रोग्राम्स हे मोफत उपलब्ध आहेत. हे प्रोग्राम फक्त फाईल्स पीडीएफ करतात असे नव्हे तर पीडीएफ फाईल र्मज करणे, स्प्लीट करणे, कॉम्प्रेस करणे ही कामंसुद्धा सहज करतात.


•  नायट्रो रिडर


नायट्रो रिडरमध्येसुद्धा फाईल पीडीएफ करता येतात. वापरायला अत्यंत सोपं आणि सुटसुटीत. यामध्ये तीनशेपेक्षा जास्त फाईल फॉरमॅटचं पीडीएफमध्ये रूपांतर करता येतं.


https://www.gonitro.com/pdf reader





•  फॉक्सिट रिडर


तुमच्या कॉम्प्युटरमध्ये पीडीएफ व्ह्युवर तरी किमान हवाच. त्यासाठी सोयीचं आहे फॉक्सिट रिडर. हा रिडर कमीत कमी रिसोर्सेस वापरतो त्यामुळे  कॉम्प्युटरवर लोडदेखील येत नाही.


http://www.foxitsoftware.com/Secure_PDF_Reader/





•  सुमात्रा पीडीएफ


मोठमोठय़ा पीडीएफ फाईल्स ओपन करण्याची किमया हे सुमत्रा पीडीएफ लिलया करते. त्यासोबतच यामध्ये उत्कृष्ट झूम आणि सर्चसुद्धा उपलब्ध आहे. ई-बुकसाठी तर हे खूपच चांगले पीडीएफ रिडर आहे.


http://blog.kowalczyk.info/softwar sumatrapdf/free-pdf-reader.html





•  पीडीएफ कॉम्प्रेसर


पीडीएफ फाईलची साईज जर मोठी असेल तर फाईल अटॅचमेंटला वेळ लागतो किंवा कधीकधी जास्त फाईल साईजमुळे फाईल इमेलसुद्धा करता येत नाही. अशावेळी एखादा चांगला पीडीएफ कॉम्प्रेसर प्रोग्राम तुमच्या मदतीला येतो. अँडव्हॉन्स पीडीएफ टूल्स आणि निव्हॉज पीडीएफ कॉम्प्रेसर असे दोन कॉम्प्रेसर चांगले आहेत. त्यापैकी निव्हॉज पीडीएफ हे ऑनलाइन पीडीएफ कॉम्प्रेसर आहे. याशिवाय अजूनही अनेक वेबसाइट्स आहेत, ज्याचा वापर करून आपण फाईल र्मज तसेच स्प्लीट करू शकतो.


 1) www.pdfmerge.com


2) www.pdfsam.org


3) www.ilovepdf.com


4) www.splitpdf.com





•  प्रायमो पीडीएफ



प्रायमो पीडीएफ हे पीडीएफ बनविण्यासाठी वापरलं जाणारं पहिल्या पाच सॉफ्टवेअर पैकी एक आहे. प्रायमो पीडीएफ जवळपास तीनशेपेक्षा जास्त फाईल फॉरमॅट्स पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करते. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, ओपन ऑफिस, एचटीएमएल, टीएक्सटी, टीफ, जेपीइजी यासारखे अनेक फॉरमॅट पीडीएफमध्ये सहज कन्व्हर्ट करता येतात. प्रायमो पीडीएफमध्ये तयार झालेली पीडीएफ फाईल कुठल्याही पीडीएफ व्ह्युवरमध्ये  पाहता येते. पीडीएफ फाईल पासवर्ड प्रोटेक्ट हे एक महत्त्वाचे साधन यात आहे.  १.२, १.३, १.४ तसेच १.५ या व्हर्जनमधे तुम्हाला फाईल पीडीएफ करता येऊ शकते.
http://www.primopdf.com/

No comments:

Post a Comment