Learn Microsoft Excel


Excel Tips & Tricks group
📚Excel Function📚
श्रेणी काढणे पद्धत 2

यामध्ये श्रेणीसाठी IF function वापरलेला होता आणि ते एकमेकामध्ये loop करून वापरलेला होता.एखादा जरी loop चुकल्यास result चुकू शकते. म्हणून आपण श्रेणी काढण्यासाठी अजुन एक function चा वापर करणार आहोत.

🔑Function Name- LOOKUP

lookup फंक्शनचे परत 3 प्रकार पडतात. जसे की...
1.LOOKUP
2.VLOOKUP
3.HLOOKUP
आज या मधील lookup फंक्शन पाहू या.

🔮समजा M या कॉलममध्ये एकूण गुणाची नोंद आहे. गुणावरुन श्रेणी काढायच आहे.
🔮N या कॉलममध्ये श्रेणी काढू.

=LOOKUP(M2,{1,21,34,41,51,61,71,81,91},{"E2","E1","D","C2","C1","B1","B2","A2","A1"})

वरील फंक्शनमध्ये M2 cell रेफ्रन्स म्हणजे गुण पहा या मध्ये 1 ते 20 दरम्यान गुण  असतील तर "E2" 21 ते 33 दरम्यान गुण असतील तर "E1" ........... या प्रमाणे श्रेणी नोंदवा असा अर्थ होईल.

जेंव्हा M कॉलममध्ये एखाद्या cell मध्ये 0 नोंद असेल तर मात्र #N/A असे error येईल. कारण आपण वरिल function मध्ये 1 पासून 100 पर्यन्तचा गुणांचा विचार केलेला आहे. error नको असेल तर या साठी अजून एक function वापरावे लागेल.

🔑IFERROR
एक्सेलच्या फुंक्शनमध्ये जर एरर येत असेल तर या फंक्शनचा वापर केला जातो.

आता वरील फंक्शनला iferror कसं वापरायचं पहा...


=IFERROR(LOOKUP(M2,{1,21,34,41,51,61,71,81,91},{"E2","E1","D","C2","C1","B1","B2","A2","A1"}),"")

म्हणजेच याचा अर्थ असा..... वरील lookup फंक्शनमध्ये एरर येत असेल तर Blank "   " म्हणजेच फार्मूलामध्ये सर्वात शेवटी " " असा नोंद केलेला आहे.यामुळे एरर येत असल्यास blank येईल. " " ऐवजी आपण 0 किंवा इतर words ही वापरु शकतो जसे... "Data not available" किंवा "Nil","No data", "गुण नोंद नाही" यापैकी कोणतेही वापरता येईल. जरी गुण कॉलममध्ये 0 नोंद असेल तर एरर येणार नाही.

No comments:

Post a Comment